पोलिस पाटील, आशा वर्कर यांना विमा संरक्षण द्या - रणजितसिंह मोहिते पाटील

पोलिस पाटील आणि आशा वर्कर यांना विमा संरक्षणाची मागणी करताना, शालेय पोषण आहाराचे पडून असलेले अन्न-धान्य विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून वाटप करावे, अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे.
ranjitsingh mohite patil demands insurance security to police patil and Asha workers
ranjitsingh mohite patil demands insurance security to police patil and Asha workers

नातेपुते - पोलिस पाटील आणि आशा वर्कर यांना विमा संरक्षणाची मागणी करताना, शालेय पोषण आहाराचे पडून असलेले अन्न-धान्य विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून वाटप करावे, अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. 

माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विविध मागण्या लावून धरल्या आहेत. त्यातीलच वरील तीन मागण्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिलेल्या निवेदनाच्या प्रतीही मोहिते पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केलेल्या आहेत. 

मोहित पाटील यांनी शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्याबाबत म्हटले आहे, की सध्या सुट्या असल्याने शालेय पोषण आहाराचे अन्नधान्य त्या-त्या शाळांमध्येच पडून आहे. सध्या अन्नधान्यामुळे सर्वसामान्यांचे हाल चालले आहेत. त्यामुळे या धान्याचे वाटप विद्ारथ्यांच्या पालकांना केल्यास काही काळासाठी प्रशन सुटू शकतो. 

वरील मागण्यांबरोबरच गेल्या आठवड्यातही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या अशा :
1 )आपल्या शेतात ठिबक सिंचन यंत्रणा बसवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना पूर्व संमती मिळाली आहे, त्यांना सध्या साहित्य उपलब्ध होत नसल्याने मुदतीत ही यंत्रणा बसवणे अडचणीचे ठरत आहे. त्यासाठी त्यांना मुदतवाढ मिळावी.
2 )आपल्या जीवावर उदार होऊन अगदी धाडसाने आपले कर्तव्य बजावणारे डॉक्टर्स व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्युपमेंट किट ( पी.पी.ई. ) उपलब्ध व्हावीत.
3 )सध्या सोलापूर जिल्ह्यात केळी,डाळिंब व द्राक्ष यासारखी फळपिके देशांतर्गत व परदेशातील बाजारपेठात पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयार आहेत. त्यासंदर्भातील धोरण तातडीने निश्चित व्हावे.
4)बचत गटांना वाटण्यात आलेल्या कर्जांच्या वसूल्या सध्या सुरू आहेत त्या थांबवण्यात याव्यात.
5)वैद्यकीय सेवेत महत्वाच्या असणाऱ्या १०८ क्रमांकावर आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिनीकांना डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी उपलब्ध व्हावेत.
6 )खाजगी रुग्णवाहिनीकांना डिझेल कोणी पुरवायचे? हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांना शासकीय पातळीवरून डिझेल मिळावे.
7 ) सध्या शेतकऱ्यांच्या शिवारातील गहू काढणीस आलेला आहे. कोरोना संसर्गाच्या संकटामुळे गहू काढणीवर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. त्याशिवाय अवकाळी पावसाच्या झळाही गहू शेतीला बसत आहेत. अशा बिकट अवस्थेत शेतकर्‍यांचा गहू तत्काळ काढणे गरजेचे आहे. त्यासाठी गहू हार्वेस्टिंग मशीनला परवानगी मिळावी व त्यासाठी लागणारे डिझेल उपलब्ध व्हावे.
8 )कोरोनामुळे शेती व्यवस्था कमालीची अडचणीत आली आहे. शेतीच्या मशागती व शेतमाल वाहतूक करणारी वाहने व शेती व्यवस्थेशी संबंधित इतर वाहनांना डिझेल पुरवण्याची व्यवस्था ठराविक पंपांवर व्हावी.
9 )पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य व पशुखाद्य याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध व्हावे.
10)अत्यावश्यक सेवेत समावेश असलेल्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची घरपोच सेवा सुरू राहण्यासाठी डिझेल उपलब्ध व्हावे.
11 )सध्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व ग्रामपंचायत स्तरावर निर्जंतुकीकरणासाठी फवारण्या सुरू आहेत. त्या फवारण्यांसाठीही डिझेल उपलब्ध व्हावे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com