`सांगोल्यातून 15 हजाराचे लिड देणार, निंबाळकर 50 हजाराने माढ्याचे खासदार होणार`

`सांगोल्यातून 15 हजाराचे लिड देणार, निंबाळकर 50 हजाराने माढ्याचे खासदार होणार`

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजित नाईक-निंबाळकर हे किमान 50 हजार मतांची आघाडी घेऊन विजयी होतील, असा विश्‍वास सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातून निंबाळकर यांना किमान 15 हजार मतांची आघाडी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. 

सांगोल्यातील मतदार विकास कामांच्या बाजूने कौल देणारा असल्याने महायुतीच्या निंबाळकर यांना सांगोल्यातून मताधिक्‍क्‍य मिळणारच असा दावा पाटील यांनी केला.

माढा व करमाळा हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता शिंदे यांना अन्य कोणत्याही मतदारसंघात आघाडी मिळणार नाही. उलट निंबाळकर यांना फलटण, सांगोला, माण-खटाव व माळशिरस या चार मतदारसंघातून किमान किमान एक लाख 20 हजार मतांची आघाडी मिळेल. ही आघाडी केवळ माढा व करमाळा या दोन मतदारसंघात भरून काढणे शिंदे यांना शक्‍य होणार नाही. त्यामुळे निंबाळकर हे किमान 50 हजार मतांची आघाडी घेऊन निवडून येतील, असे पाटील यांनी सांगितले.

शहाजी पाटील 1995 च्या निवडणुकीत गणतपराव देशमुख यांचा पराभव करून आमदार म्हणून निवडून आले होते. पाटील सध्या शिवसेनेत आहेत. भाजपाच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबध आहेत. या निवडणुकीत निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी भाजपाने पाटील यांच्यावर सांगोला विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकली आहे. सांगोल्याबरोबरच माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस, माण-खटाव व माढा विधानसभा मतदारसंघात पाटील यांचा चांगला संपर्क आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी शहाजी पाटील यांचे चांगले संबध आहेत. त्या माध्यमातून तालुक्‍याचा पाणी प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहेत, असे पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com