भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रणजित पाटील यांचे नाव आघाडीवर

रणजित पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. ते अमरावती पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत.
Ranjit-Patil
Ranjit-Patil

मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याने भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबत तर्क लढविले जात आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याही नावाचा विचार या पदासाठी होत आहे. परंतु त्यांना परळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवायची असल्याने त्यांचे नाव थोडे बाजूला पडले आहे.

रणजित पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. ते अमरावती पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे स्टार प्रचारक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नागपूरच्या नेतेमंडळींशी त्यांचा चांगला संपर्क आहे.

रणजित पाटील यांच्याकडे गृहखात्याशिवाय नगरविकास, संसदीय कार्य, कौशल्य विकास आदी खात्यांची जबाबदारी देखील आहे. अमित शहा यांच्याशी त्यांचे थेट संबंध असून शहा त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रभावित झाले होते असे समजते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com