नांगरे पाटलांच्या समोर 'मर्दानी' राणी मुखर्जी युवतींना काय म्हणाली ? 

राणी यावेळी म्हणाली, 'मर्दानी-2'मधूनमहिला पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारताना महिलेला आणखी एका अतिरिक्त अधिकार असल्याची जाणीव झाली.
Rani-Mukharji-with-Nangre-patil
Rani-Mukharji-with-Nangre-patil

नाशिक  : आजचा काळ बदलतो आहे. त्यामुळे मुलींनो धीट बना. गरज पडली तर परिस्थितीला सामोरे जा. त्यासाठी महाविद्यालयात सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण घ्या अशी सुचना 'मर्दानी 2' चित्रपटाची नायिका अर्थात नाय राणी मुखर्जीने आज मुलींना केले.

येथील पोलिस आयुक्तालयातर्फे शहरातील साडे चारशे महाविद्यालयीन युवतींसाठी महिला सुरक्षेसंदर्भात येथील हॉटेल ताज गेट वे येथे परिसंवाद केला. यावेळी त्या बोलत होत्या.

महिला अत्याचारावर चर्चा खूप होते. पण, समाजातील तिचा सन्मान वाढला आहे का? आपल्याच घरातून जर तिला सन्मान मिळत नसेल तर... मानसिकता बदलण्याची गरज आहे. सोच बदलो... हर औरत एक दूर्गा है.. जो बच्चे को जन्म दे सकती है, तो वो हैवान को काली मॉं बनकर मार भी सकती है... बेटी बचाओ असे नाही तर, बेटा समजाओ.. बेटी पढाओ और उसे बहादूर बनाओं.. असाच आक्रमक सूर 'महिला हिंसाचाराविरोधात माझा नकार' या परिसंवादातून निघाला.

राणी यावेळी म्हणाली, 'मर्दानी-2'मधून   महिला पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारताना महिलेला आणखी एका अतिरिक्त अधिकार असल्याची जाणीव झाली. महिला पोलीसांनी या आपल्या अधिकाराचा वापर केलाच पाहिजे. पात्रात वडलांचे नाव शिवाजी असल्याने प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचाच अशीर्वाद लाभला.

महिलेचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. तो तिचा अधिकारच आहे. महिलेवर अत्याचार करू पाहणाऱ्याची गय करता कामा नये. त्याठिकाणी त्याला शिक्षा देण्यासाठी महिलेने दूर्गेचे रुप घेतलेच पाहिजे. शाळा-महाविद्यालयांमध्ये युवतींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण बंधनकारकच करायला हवे. देशातील प्रत्येक महिला, मुलगी ही पॉवरफुल्ल वुमेन असायला हवी आणि ती आहेच.

यावेळी राणी मुखर्जी, मुक्ता बर्वे, प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्‍वरी एस., पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील, प्रवीण तरडे, उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांच्या हस्ते "निर्भया' पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com