ranjeet sarwarkar and congress | Sarkarnama

कॉंग्रेसविरोधात 100 कोटींचा दावा दाखल करण्याचा रणजीत सावरकर यांचा इशारा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीच्या " जनमानसाची शिदोरी' या मासिकात प्रकाशित झालेल्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावरील लेखावरून पुन्हा वाद उद्‌भवला आहे. हा अंक मागे न घेण्याची भूमिका कॉंग्रेसने घेतल्यामुळे 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी दिला आहे. 

या मासिकात प्रसिद्ध झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील दोन लेखांना भाजपने आक्षेप घेतला आणि संबंधित अंक मागे घेण्याची मागणी केली होती; परंतु कॉंग्रेसने मासिकाचा अंक मागे न घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे रणजीत सावरकर यांनी कॉंग्रेसच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकर यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख