विकासकामांतील दिरंगाईबद्दल डॉ. पाटील यांच्याकडून कानउघाडणी, मोटारसायकलवरून कामांचा आढावा

अशोक वाटीका ते सरकारी बगीच्या कार्यालयाच्या पर्यंतच्या रस्त्याबाबतही असाच प्रकार सुरू असल्याने पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात सुरू असलेल्या सर्व विकास कामांचा दर्जा चांगला ठेऊन ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
 विकासकामांतील दिरंगाईबद्दल डॉ. पाटील यांच्याकडून कानउघाडणी, मोटारसायकलवरून कामांचा आढावा

अकोला: शहरात संथगतीने सुरू असलेल्या अनेक विकास कामांची आज सकाळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मोटारसायकलवर फिरून पाहणी केली. यावेळी कामांचा दर्जा, नियमांचे होत असलेले उल्लंघन व कामाची संथ गती यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांचीही कानउघाडणी केली. 

केंद्र व राज्यात भाजपची आल्यावर अकोल्यातील अनेक प्रलंबीत प्रश्न, समस्या निकाली काढत मोठ्या प्रमाणात विकास काम करण्यासाठी सत्ताधार्यांनी पुढाकार घेतला आहे. या कामांचा दर्जा चांगला राहावा व सर्व कामे वेळेत पुर्ण व्हावीत म्हणून पालकमंत्री डॉं. रणजित पाटील यांनी यापूर्वीही बैठकांमध्ये संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले आहेत. शहरात सुरू असलेली विकास कामे, काही कामांबाबत नागरीकांनी केलेल्या तक्रारीमधील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज सकाळी दहा वाजेपासुनच शहरात मोटारसायकलने फिरून पाहणी केली. 

यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक हरिष आलीमचंदाणी, आशिष पवित्रकार, दिपक मायी, सदानंद ईश्वरकर, हरिष लाखानी, बुखरान अहेमद, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजित काळे पाटील, महेंद्र काळे, विरेंद्र काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी विकास कामांची संथगती पाहुन त्यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. 

शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या सांस्कृतिक भवनाच्या कामावर कुठलाही फलक नसल्यामुळे कामाचा कालवधी, निधी, कधी पुर्ण होणार, ठेकदार कोण याबाबत सामान्य नागरीकांना माहिती मिळणार कशी? असा प्रश्न विचारीत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. येत्या दोन महिन्यात या भवनाचे बांधकाम पुर्ण होणे अपेक्षीत असताना बांधकामाची संथगती पाहून पालकमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत सर्व विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरले. 

अशोक वाटीका ते सरकारी बगीच्या कार्यालयाच्या पर्यंतच्या रस्त्याबाबतही असाच प्रकार सुरू असल्याने पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात सुरू असलेल्या सर्व विकास कामांचा दर्जा चांगला ठेऊन ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com