ranjana bhansi and tukaram munde | Sarkarnama

मुंढेंच्या बदलीबद्दल फटाके फोडणे, महापौर रंजना भानसींना भोवले

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची गुरूवारी बदली झाली. त्याचा आनंद साजरा करताना महापौर निवासस्थानी फटाके फोडण्यात आले. यावेळी महापौर रंजना भानसी व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. याबाबत सरकारवाडा पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. ाम्ही नाशिककर संघटनेच्या पदाधिकारी आज सरकारवाडा पोलिसांत जाऊन त्यांनी तक्रार केली. 

यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने फटाके रात्री आठ ते दहा यावेळीच फोडावेत या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी याबाबत टाळाटाळ केल्यावर त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर महापौर रंजना भानसी व त्यांच्या समर्थक कार्यकर्ते याच्याविरोधातील तक्रार स्विकारली. त्याची प्रत दुपारी ऑनलाईन देण्यात येईल असे सांगितले. समाधान भारतीय, अनिल भडांगे, विनायक येवले, योगेश कापसे, दत्तु बोडके, सुमित शर्मा आदींसह मोठ्या संख्येने समर्थक यावेळी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख