माळेगावचे अध्यक्ष रंजन तावरे यांना अंतरिम जामीन मंजूर

ranjan taware
ranjan taware

माळेगाव : जिल्हा व सत्र न्यायाधीश (बारामती) आर. एल. लोखंडे यांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना व शरद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रंजन तावरे यांचा सोमवार (ता.२७) पर्यंत तात्पुरता जामीन  आज मंजूर केला.

सोमवारी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेतली जाईल, असेही संबंधित न्यायालयाने आदेशात नमूद केले. माळेगाव कारखाना पंचावर्षिक निवडणूकीच्या तोंडावर तावरे यांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले. तावरे यांच्या बाजूने अॅड. एस.एम.शहा (पुणे) यांनी न्यायालयात बाजू मांडली. सहकार कायद्यानुसार फिर्यादीच्या विरुद्ध १०१ प्रमाणे मिळालेले वसुलीचे दाखले,फेरफार, संस्थेतील ठरावाच्या नकला आणि माळेगाव कारखाना निवडणूकीच्या निमित्ताने सध्या निर्माण झालेली राजकिय स्थिती आदी मुद्दे अॅड. शहा यांनी संबंधित न्यायालयाच्या निदर्शास आणून दिले.

 माळेगाव कारखान्याचे संचालक सुरेश तुकाराम खलाटे (रा.कांबळेश्वर) यांनी शरद पतसंस्थेचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी पतसंस्थेतेचे सचिव नंदकुमार खैरे यांच्या संगनमताने ५१ लाख ३० हजार रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद तालुका पोलिस ठाण्यात दिली होती. त्या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी शनिवार (ता.१८) रोजी फिर्य़ादिसह सहकार खात्याच्या अहवालाच्या आधारे श्री.तावरे व श्री.खैरे यांच्याविरुद्ध विविध कमलमान्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, रक्कमेचा अपहार करणे, विश्वासघात करणे, तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायदा आदी कलमांचा समावेश होता. 

दुसरीकडे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामदास आटोळे, राजेंद्र बुरूंगले, उज्वला कोकरे, बाळासाहेब गवारे यांनी तत्कालिन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अपात्रतेच्या कारवाईविरुद्ध आज (बुधवारी) मुंबई उच्च न्यायलयात अंतिम सुनावणी पार पडली. त्या प्रकरणाचाही निकालही संबंधित न्यायलयाने उद्या गुरूवार (ता. २३) रोजीपर्यंत राखून ठवला. या निकालाच्या आधारे संबंधित नेतेमंडळीचे राजकिय भवितव्य सध्याच्या माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीत निश्चित होईल. माळेगावच्या थकबाकी प्रकरणात वरील पदाधिकाऱ्यांच्यावर ९ सप्टेंबर २०१६ रोजी सहाकर खात्याने अपात्रतेची कारवाई केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com