rane lashes on sanjay raut | Sarkarnama

संजय राऊत यांना माज आलाय, त्यांची जीभ सैल सुटलेय - नारायण राणे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मुंबई : छत्रपती शिवरायांच्या वंशजाबद्दल वेडेवाकडे बोलणारे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि त्यांना सत्तेचा माज आलाय, त्यांची जीभ सैल सुटलेय, त्यांनी पुन्हा असे वक्तव्य केले तर त्यांची जीभ जागेवर राहणार नाही असा खणखणीत इशारा माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिला. राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी पुरावे मागणारे संजय राऊत कोण असा सवालही त्यांनी विचारला. 

राऊत यांच्या वक्तव्याबद्दल अद्याप मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुठलेही वक्तव्य केले नाही याचा अर्थ त्यांना संजय राऊत यांचे वक्तव्य मान्य आहे का ? असा अर्थ काढायचा का ? असा प्रश्‍नही राणे यांनी विचारला. राऊत यांच्या वक्तव्याचे जर राज्यात काही गंभीर परिणाम झाले तर त्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर असेल असेही त्यांनी सांगितले. 

संजय राऊत यांना मी पत्रकार मानत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे महाराष्ट्राची देशात ओळख आहे त्यामुळे राऊत यांनी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्याकडे कसलेही पुरावे मागू नयेत संजय राऊत यांनी पुन्हा असली वक्तव्ये करू नयेत असा इशाराही त्यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख