पोराची मस्ती आणि वडिलांची मात्र माफी...

 पोराची मस्ती आणि वडिलांची मात्र माफी...

नवी दिल्ली : नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य चुकीचे असून मी त्या अधिकाऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये घडलेल्या घटनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंत्यांच्या अंगावर चिखलाची बादली ओतली होती. तसेच या अधिकाऱ्याला पुलाला बांधण्याचा प्रयत्न केला होता. 

राणे यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी नीतेश राणे यांनी या प्रकरणावर एका वाहिनीशी बोलताना आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्याचे जोरदार समर्थन केले आहे. या अधिकाऱ्यांना असाच धजडा शिकवला पाहिजे अशी भाषा त्यांनी वापरली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयवर्गीय यांच्या मुलाचे प्रकरण ताजे असताना आता राणे यांच्याबाबत व त्यांच्या मुलाच्या बाबत भाजप काय भूमिका घेणार अशा प्रश्‍न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश याला भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com