Rane is desparate to increase his clout in congress | Sarkarnama

कॉंग्रेसमध्ये वजन वाढविण्यासाठी  राणेंचा खटाटोप : प्रमोद जठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

राणेंच्या आग्रहावरूनच पर्यटनमंत्र्यांची भेट
पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्यापूर्वी नारायण राणे यांनी त्यांनी फोन केला होता. तसेच घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणावरूनच पर्यटनमंत्र्यांनी राणेंची कणकवलीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यात कुठलेच राजकारण नव्हते. तसेच पक्षप्रवेशाबाबतचा देखील काहीच विषय नव्हता असे श्री.जठार म्हणाले. 

कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना कॉंग्रेसमधील स्थान बळकट करायचे आहे. पक्षात वजन वाढवायचे आहे. यासाठी ते भाजप प्रवेशाच्या अफवा उठवीत आहेत. पक्षश्रेष्ठींवर दबाव आणायचा आणि पद मिळवायचे यासाठीच राणेंचा हा खटाटोप सुरू, आहे अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनीयेथे केली.
येथील भाजप कार्यालयात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र शेट्ये, शिशिर परुळेकर, प्रज्ञा ढवण आदी उपस्थित होते. 
श्री.जठार म्हणाले, ""राणेंना कॉंग्रेस पक्षात फारसे स्थान उरलेले नाही. यामुळे त्यांनी गोबेल्स नीती प्रमाणे भाजप प्रवेशाची चर्चा सुरू केली आहे. त्यांना भाजपमध्ये यायचे नाही. तर कॉंग्रेस पक्षातच वजन वाढवून घ्यायचे आहे. यासाठी सातत्याने गेले दोन महिने त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा सुरू केली आहे.
राणेंनी शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला ही त्यांची शोकांतिका होती. मात्र ते आता दुसऱ्या पक्षात जात असेल तर तो विदुषकी प्रकार ठरणार आहे. ते विरोधी पक्षात आहेत, तेच ठीक आहे. त्यांनी पक्ष बदलला तर जनतेच्या मनातून ते आणखी उतरतील. यामुळे राणेंनी कॉंग्रेसमध्येच राहावे, तेच त्यांच्या भल्याचे आहे.''

राणेंच्या आग्रहावरूनच पर्यटनमंत्र्यांची भेट
पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्यापूर्वी नारायण राणे यांनी त्यांनी फोन केला होता. तसेच घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणावरूनच पर्यटनमंत्र्यांनी राणेंची कणकवलीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यात कुठलेच राजकारण नव्हते. तसेच पक्षप्रवेशाबाबतचा देखील काहीच विषय नव्हता असे श्री.जठार म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख