rane and state government | Sarkarnama

आता जे घडेल त्याला मुख्यमंत्री आणि सरकार जबाबदार - नारायण राणे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत जे काही बोलत आहेत त्याला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पूर्णपणे जबाबदार आहेत,अशी टीका माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केली आहे. पुरावे मागणारे खासदार राऊत कोण ? असा प्रश्‍न करून आता यापुढे जे घडेल त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार जबाबदार राहील, असा इशारा खासदार राणे यांनी दिला आहे. 

राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या पार्श्‍वभूमीवर राणे यांनी पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. सरकार आल्यानंतर त्यांच्या भावाला मंत्रीमंडळात घेतले नाही. त्यामुळे खासदार राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते काहीही बोलू लागले आहेत. त्यांना आवरण्याची गरज आहे. छत्रपती उदयनराजे यांच्याबद्दल ते जे काही बोलले आहेत. त्याबद्दल त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्यामुळे आता जे काही घडेल त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे सरकार जबाबदार असेल, असेही राणे यांनी सांगितले. 

दरम्यान, खासदार राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राऊत यांच्याविरोधात राज्यभर निषेध मार्चे, आंदोलन व बंद पाळण्यात येऊ लागला आहे. आज साताऱ्यात बंद पाळण्यात आला. उद्या सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. सोलापूर, जालना येथे आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी खासदार राऊत यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख