rane and election | Sarkarnama

नाईक याने केलेल्या पराभवाची सल कायम - नारायण राणे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मालवण : ""वैभव नाईकसारख्या नवख्या उमेदवाराकडून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या मला पराभव स्वीकारावा लागला, ही सल मनात कायम आहे. हा पराभव मी कधीही विसरणार नाही,'' अशी भावना माजी मुख्यमंत्री व "स्वाभिमान'चे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी मंगळवारी व्यक्त केली. 
""आगामी निवडणुकीत या मतदारसंघातून मला 80 ते 85 टक्के मतदान व्हायला हवे. ही सुवर्णसंधी दवडल्यास मालवण मागासलेले राहील. त्यामुळे या दृष्टिकोनातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उद्यापासूनच कामाला लागावे,'' असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

"स्वाभिमान' च्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. त्या वेळी राणे म्हणाले की, मालवणबद्दल माझ्या मनात आदर व अभिमान आहे. याच मतदारसंघातून सहावेळा आमदार झालो. मागील निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला. गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री, खासदार, आमदार आपला नाही. मी आज राज्यसभा खासदार आहे, हे असे होते का? याचा जनतेने विचार करावा. मला 1990 पासून 80 टक्के मते मिळायची. नीलेश राणे यांना 35 टक्के मते कमी मिळाली. त्यामुळे मी आमदार, मंत्री असताना कुठे कमी पडलो का, असा सवालही त्यांनी केला. 

आत्मचरित्राचे शुक्रवारी प्रकाशन 
माझ्या आत्मचरित्राचे प्रकाशन शुक्रवारी (ता. 16) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिक्षणमंत्री आशिष शेलार, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असल्याचे राणे यांनी या वेळी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख