कॉंग्रेसच्या सोशल मिडियाची सूत्रे अभिनेत्री स्पंदनाकडे!

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणांनी आणि वक्तव्यांनी; तसेच कॉंग्रेसच्या भाजपवर हल्ला करणाऱ्या गुजरातमधील "विकास वेडा झाला आहे' सारख्या प्रचाराने सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चा झडते आहे. आतापर्यंत पारंपरिक प्रचारात रुतलेला कॉंग्रेसचा रथ सोशल मिडियाच्या वाटेवर भन्नाट धावू लागला आहे. कारण या रथाचे सारथ्य पस्तीशितील माजी खासदार, दाक्षिणात्य अभिनेत्री दिव्या स्पंदना ऊर्फ राम्या हिच्याकडे राहुल गांधी यांनी सोपवले आहे!
कॉंग्रेसच्या सोशल मिडियाची सूत्रे अभिनेत्री स्पंदनाकडे!

पुणे : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणांनी आणि वक्तव्यांनी; तसेच कॉंग्रेसच्या भाजपवर हल्ला करणाऱ्या गुजरातमधील "विकास वेडा झाला आहे' सारख्या प्रचाराने सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चा झडते आहे. आतापर्यंत पारंपरिक प्रचारात रुतलेला कॉंग्रेसचा रथ सोशल मिडियाच्या वाटेवर भन्नाट धावू लागला आहे. कारण या रथाचे सारथ्य पस्तीशितील माजी खासदार, दाक्षिणात्य अभिनेत्री दिव्या स्पंदना ऊर्फ राम्या हिच्याकडे राहुल गांधी यांनी सोपवले आहे! 

तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली राम्याचा जन्म कर्नाटकातील बंगळुरुचा. राम्याची आई रंजिता कॉंग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या. वडील आर. टी. नारायण उद्योगपती. राम्याने 2003 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी कन्नड चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. त्यानंतर तिने कन्नडबरोबरच तमीळ आणि तेलुगु चित्रपटांतही विविधरंगी भूमिका साकारल्या. चित्रपटांतील यशाचा चढता आलेख सुरू असतानाच तिने 2012 मध्ये युवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तिने 2013 मध्ये कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा! मात्र, 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तिला जनता दलाच्या (धर्मनिरपेक्ष) सी. एस. पुट्‌टराजू यांच्याकडून साडेपाच हजार मतांनी पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे पुन्हा तिने अभिनयाकडे मोर्चा वळवला. 

यंदा गुजरात आणि हिमाचल प्रदेश, तर पुढील वर्षी कर्नाटक; तसेच ईशान्यकडील नागालॅंड, मिझोराम, त्रिपुरा आणि मिझोरामच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीतील रणनितीमध्ये सोशल मिडियाची भूमिका प्रमुख असणार आहे. या पार्श्‍वभूमिवर राहुल गांधी यांनी राम्याकडे कॉंग्रेसच्या सोशल मिडियाचे सारथ्य सोपवले आहे. त्याचा परिणाम दिसू लागला आहे.... राहुल गांधी प्रकाशझोतात येऊ लागले आहेत. कारण त्यांच्यामागे राम्याच्या सोशल मिडियाची स्ट्रॅटेजी उभी आहे. अमेरिकेत राहुल गांधींनी केलेले भाषण असो, की गुजरातमधील प्रचार... लोकांपर्यंत पोचतो आहे. कारण केवळ राम्या आहे. यानिमित्ताने कॉंग्रेस पुन्हा तरुणांपर्यंत पोचू लागली आहे. कॉंग्रेस कात टाकू लागली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना हव्या असलेल्या भाषेत सोशल मिडियाद्वारे प्रचार यंत्रणा राबवल्याने भाजपच्या विजयाची घोडदौड 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरूच आहे. त्यापुढे सारेच पक्ष हतबल झाले आहेत. कॉंग्रेसचीही अवस्था वेगळी नाही. भाजपच्या सोशल मिडियावरील प्रभावाला तोंड देण्यासाठी कॉंग्रेसनेही आता रणनिती आखली आहे. सोशल मिडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. यापूर्वी सोशल मिडियाची जबाबदारी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांचे चिरंजीव, रोहटकचे दोनदा खासदार राहिलेले दिपेंद्रसिंग हुडा यांच्याकडे होती. हुडा यांच्याकडे सोशल मिडियाची जबाबदारी असताना, कॉंग्रेसला आपले बस्तान म्हणावे तसे बसवता आले नव्हते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com