Ramtek will Give Ten Thousand Votes Lead to Krupal Tumane - Reddy | Sarkarnama

रामटेकमधून कृपाल तुमानेंना 10 हजार मतांचे लीड : आमदार डी. मल्लीकार्जुन रेड्डी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 मे 2019

रामटेक विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार कृपाल तुमाने यांना आठ ते 10 हजार मताचे लीड हमखास मिळवून देणार असल्याचे आमदार डी. मल्लीकार्जुन रेड्डी यांना 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार कृपाल तुमाने यांना आठ ते 10 हजार मताचे लीड हमखास मिळवून देणार असल्याचे आमदार डी. मल्लीकार्जुन रेड्डी यांना 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

रेड्डी म्हणाले, "यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. प्रचारकार्यात कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविन्यासाठी जनतेने मतदान केले. हे येत्या 23 तारखेला दिसणारच आहे. देशात आणि राज्यात आमचे सरकार असल्यामुळे भरपूर विकासकामे गेल्या पाच वर्षात केली, ती जनतेसमोर आहेतच. विकासकामे घेऊनच आम्ही मतदारांसमोर गेलो आणि उत्स्फुर्त प्रतिसाद मतदारांकडून मिळाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या झालेल्या सभा कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देऊन गेल्या. त्यामुळे आम्ही प्रचारात चांगली आघाडी घेतली. प्रचारतोफा थंडावण्यापूर्वी नागपूर आणि रामटेक येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपुरमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मोठी सभा झाली. त्याचा सकारात्मक प्रभाव मतदारांवर पडला. त्याचा लाभ निश्‍चितपणे होईल,"

"पुन्हा मोदी पंतप्रधान झाल्यास संविधान सुरक्षित राहणार नाही, असे म्हणत विरोधकांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि संविधानाचा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न केला. पण मतदारांनी त्याला फारसा प्रतिसाद दिल्याचे दिसले नाही. विदर्भातील मतदान पहील्या टप्प्यात झाले. त्यामुळे प्रचापासाठी वेळ कमी मिळाला. परीणामी दुरवरच्या गावांमध्ये उमेदवाराला पोचण्यात अडचणी आल्या. आदीवासीबहुल काही गावांतील मते कॉंग्रेसच्या उमेदवाराकडे वळली, हे सत्य आहे. पण तरीही रामटेकमधून आपण कृपाल तुमानेंना आठ ते 10 हजार मतांची लीड निश्चितितपणे मिळवून देणार," असा दावा आमदार रेड्डी यांनी केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख