राहुल गांधींना वासनिक समर्थकांचे रामटेकसाठी साकडे 

पूर्व विदर्भातील चंद्रपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीचा कॉंग्रेसचा गोंधळ अद्यापही संपलेला नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी अत्यल्प कालावधी राहिलेला आहे. रामटेकमधून भाजप-शिवसेना युतीचे कृपाल तुमाने यांच्या नावाची घोषणा झालेली आहे.
राहुल गांधींना वासनिक समर्थकांचे रामटेकसाठी साकडे 

नागपूर : पूर्व विदर्भातील चंद्रपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीचा कॉंग्रेसचा गोंधळ अद्यापही संपलेला नाही. उमेदवारी दाखल करण्यासाठी अत्यल्प कालावधी राहिलेला आहे. रामटेकमधून भाजप-शिवसेना युतीचे कृपाल तुमाने यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. अशात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या समर्थकांनी रामटेकमधून वासनिकांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.
 
निवडणूक जवळ आहे आणि फार कमी वेळ राहीलेला आहे. अशा परीस्थीतीत इतर कुणाला उमेदवारी दिल्यास निवडणूक हारण्याचीच शक्‍यता जास्त आहे आणि ईतक्‍या कमी वेळात रामटेकमध्ये टक्कर देऊ शकेल असा उमेदवार दिसत नाही, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव मुजीब पठाण यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. मुकुल वासनिक यांचा दीर्घ अनुभव, जनसंपर्क आणि कार्यशैलीमुळे रामटेकमध्ये पक्षाचा विजय सोपा होईल. त्यामुळे राहुल गांधींनी वासनिक यांना रामटेकमधून लढण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे, तसे निवेदनही राहुल गांधींना दिल्याची माहीती आज येथील प्रेस क्‍लब मध्ये देण्यात आली.

यावेळी मुजीब खान यांच्यासह नाना गावंडे, बाबुराव तिडके, तक्षशीला वाघधरे, कुंदा राऊत, संजय मेश्राम, भिमराव कडू, अनिल पा'टील, राहुल घरडे, प्रसन्ना तिडके, नंदा पराते, नंदा नारनवरे, जयमाला शेंडे, दुर्योधन ढोणे, शैलेश थोराणे, योगेश कुमकुमवार, राजेश थोराणे, अश्‍विन बैस, हेमंत रंभाड, रजत वरघने होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com