रामटेक : उमरेडमध्ये फेरमतदानाची गजभियेंची मागणी

रामटेक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे.
रामटेक : उमरेडमध्ये फेरमतदानाची गजभियेंची मागणी

नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे. 

उमरेड विधानसभा मतदारसंघातील एका ईव्हीएमची बॅटरी बंद असून दुसऱ्या एका मशीनमध्ये दोन सी.यू. नंबर दाखवत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. 

विशेष म्हणजे उमरेड येथील स्ट्रॉंग रुमचे डीव्हीआर चोरीला गेले होते. याची तक्रारही त्यांनी केली होती. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून गजभिये यांनी उमरेडमध्ये फेरमतदान करण्याची मागणी केली आहे. 

जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दोन डीव्हीआर चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या पथकानेसुद्धा या प्रकरणाची चौकशी केली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com