शिवतारेंच्या पुरंदरमध्ये `जलयुक्त`मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप : `लाचलुचपत`कडून चौकशीचा आदेश

शिवतारेंच्या पुरंदरमध्ये `जलयुक्त`मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप : `लाचलुचपत`कडून चौकशीचा आदेश

मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज दिले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची माहिती सभागृहात दिली होती. त्यावेळी संबंधित मंत्र्यांनी भ्रष्टाचार झाल्याची कबुलीही जाहीररित्या दिली होती. मात्र या प्रश्नावर सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी कृषी आयुक्तांनी पुरंदर तालुक्यातील झालेल्या जलयुक्त शिवार कामातील भ्रष्टाचाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येवू नये, असा अहवाल जलसंधारण विभागास सादर केला असल्याची गंभीर माहिती समोर आणली.

तत्पूर्वी या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत विभागाकडून न करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी किंवा राज्याच्या मंत्रीमंडळातील सदस्याने कृषी आयुक्तांना लेखी पत्र दिले होते का? असा गंभीर प्रश्नही आमदार हेमंत टकले यांनी सभागृहात उपस्थित केला.

एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झालेला असल्याने याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. या अनियमिततेप्रकरणी लाचलुचपत विभागाने गुप्त चौकशी करून तक्रारीत तथ्य असल्याचे नमुद केले होते व त्याअनुषंगाने जलसंधारण विभागाकडे उघड चौकशी करण्याची परवानगी मागितली होती परंतु जलसंधारण राज्यमंत्री यांच्या लेखी पत्रावरून कृषी आयुक्त यांनी याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असा अहवाल शासनास पाठवला व जलसंधारण विभागाने परवानगी नाकारली असल्याचा आरोपही आमदार हेमंत टकले यांनी केला.

दरम्यान  याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याचे निर्देश सभापतींनी यावेळी दिले. यावेळी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र कॅबिनेट मंत्री उपस्थित असतांना राज्यमंत्री कसे काय उत्तर देऊ शकतात असा सवाल करत राष्ट्रवादीच्या आमदारांनी गोंधळ केल्याने कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com