ramraje nimabalkar and udyanraje | Sarkarnama

माझ्या जिवितास धोका, मी दिल्लीतच जाणार : रामराजे निंबाळकर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 सप्टेंबर 2018

सातारा : आता मला खाली जायचे नाही, मला वर जायचे आहे. येथे माझ्या जिवितास धोका आहे, तसेच साताऱ्याचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही, त्यामुळे मला दिल्लीतच जावे लागले, असे स्पष्ट मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून व्यक्त केले. फलटण येथील एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

रामराजे म्हणाले, तुमचा हा कार्यक्रम तळमजल्यावर आहे. तो वरच्या मजल्यावर घ्यायला हवा होता. म्हणजे आपण येथे खूर्ची टाकून बसू शकलो असतो. आता मला खाली जायचे नाही. आता वर जायचे आहे. वर म्हणजे दिल्लीत जायचे आहे. येथे माझ्या जिवितास धोका आहे. तसेच साताऱ्याचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. त्यामुळेच मला दिल्लीतच जावे लागेल, असे त्यांनी खासदार उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख