ramraje naik nimbalkar in satara yin programme | Sarkarnama

युवाशक्तीला विधायकतेची जोड हवी : रामराजे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 मे 2018

सातारा : सध्याचे युग स्पर्धेचे आहे, असे म्हटले जातं. मात्र, खरे तर हे संधीचे युग आहे. राज्यभरातील युवाशक्‍तीच्या साथीला "यिन' आहे. भारतातील युवाशक्‍तीसारखी मोठी शक्‍ती कोणत्याही देशात नाही. तीला विधायकतेकडे नेले पाहिजे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

सातारा : सध्याचे युग स्पर्धेचे आहे, असे म्हटले जातं. मात्र, खरे तर हे संधीचे युग आहे. राज्यभरातील युवाशक्‍तीच्या साथीला "यिन' आहे. भारतातील युवाशक्‍तीसारखी मोठी शक्‍ती कोणत्याही देशात नाही. तीला विधायकतेकडे नेले पाहिजे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या "यिन समर यूथ समिट'च्या उद्‌घाटनप्रसंगी सभापती रामराजे बोलत होते. येथील राधिका सांस्कृतिक संकुलात ही परिषद सुरू झाली आहे. यावेळी स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संस्थापक सुनील पाटील, समर्थ एज्युकेशन ट्रस्टच्या सावकार कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र भोसले, हॉटेल महाराजा पॅलेसचे ऍड. जनार्दन भोसले, सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, "यिन'चे महाराष्ट्र प्रमुख तेजस गुजराथी उपस्थित होते. 

स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी या परिषदेसाठी मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या परिषदांसाठी निलया ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट पुणे, अभी ग्रुप ऑफ कंपनीज्‌, सुहाना प्रवीण मसालेवाले, रायसोनी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट, सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌, सृजन ऍनिमेशन हे सहप्रायोजक आहेत. 

रामराजे म्हणाले, 21 व्या शतकातील तरुणपिढीला शिक्षण, उद्योगाबरोबर स्वयंरोजगार, रोजगार, प्रशासकीय क्षेत्रात मोठी संधी आहे. दिल्लीच्या प्रशासनात महाराष्ट्रातील माणसे क्‍वचितच आढळतात. त्यामुळे युवा पिढीने आयएएस होण्यासाठीही प्रयत्न करून भविष्यात आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करावे. सकाळ मिडीया ग्रुपचे व्यवस्थापकिय संचालक अभिजीत पवार यांनी राज्यभरातील तरुण पिढीला "यिन'च्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध केले आहे. आजच्या पिढीबद्दल आमच्या जगाकडून अपेक्षा आहेत. आम्ही राजकर्ते युवापिढीला संधी देऊ पण, "यिन'ने संधीचे सोने करणारी युवा पिढी घडवावी. देश म्हणजे तुम्हीच आहात, तुम्ही घडला तर देश घडेल.'' 

सरकारनामा मोबाईल ऍप डाउनलोड करा 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख