ramraje naik nimbalkar criticise sadabhau khot | Sarkarnama

साडेचार वर्षापूर्वी माढ्यात शिट्टी वाजविणारे सदाभाऊ कुठे गेलेत?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

सहकाराला फारसे भविष्य आहे असे वाटत नाही.  

फलटण (जि. सातारा) : श्रीराम साखर कारखान्याने मातृसंस्था या नात्याने शेतकऱ्यांना विविध अंगाने सतत मदत केली आहे. पण साडेचार वर्षापूर्वी माढा लोकसभा निवडणुकीततेच शिट्टी वाजवणारे कुठे गेले आहेत, असा प्रश्‍न विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता उपस्थित केला. 

फलटण तालुक्‍यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या 63व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रामराजे बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, डी. के. पवार, रेश्‍मा भोसले यांच्यासह संचालक व शेतकरी उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, आजच्या स्थितीत सहकार क्षेत्राच्या भविष्याबाबत विचार करताना वास्तवाकडे डोळेझाक करून चालणार नाही. कारण या क्षेत्राबाबत चक्र उलटे फिरते आहे. अशा परिस्थितीत साखरेचे कमी होत चाललेले दर पहाता शेतकऱ्यांची ऊसाच्या दराबाबत होणारी अवास्तव मागणी कितपत योग्य आहे. दराची मागणी करताना शेतकऱ्यांनी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रामराजे म्हणाले, सुमारे 16 वर्षांपूर्वी कारखान्यावर किती कर्ज आहे हाविषय आमच्यासाठी महत्वाचा नव्हता तर आमच्या आजोबा श्रीमंत मालोजीराजेनाईक निंबाळकर यांनी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन काढले लाकारखाना अडचणीवर मात करीत चालू ठेवणे महत्वाचे होते. सहकाराला फारसे भविष्य आहे असे वाटत नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख