ramraje naik nimbalkar criticise opposition | Sarkarnama

फलटणमध्ये 'चंबळचे दरोडेखोर' आलेत!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

सध्याची राजकीय स्थिती पाहता मी विविध पक्षात प्रवेश करणार असा गवगवा सुरू आहे.  

फलटण : पाण्यामुळे फलटण तालुक्यात संपत्ती आली व जोडीला चंबळचे दरोडेखोर आले, त्यांचा बंदोबस्त आपण करणार आहात का? असा सवाल करून शरद पवार यांना न दुखावता जनतेच्या भल्यासाठी योग्य निर्णय घ्यावा लागेल, असे सूचक वक्तव्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण शहरातील अनंत मंगल कार्यालयात राजेगटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, बंटीराजे खर्डेकर, डी. के. पवार, पंचायत समिती सभापती प्रतिभा धुमाळ, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, खंडाळा तालुका माजी सभापती रमेश धायगुडे, बकाजीराव पाटील, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, सध्याची राजकीय स्थिती पाहता मी विविध पक्षात प्रवेश करणार असा गवगवा सुरू आहे. यासंबंधाने मी काहीही बोललेलो नाही. तथापि आजच्या तरुण पिढीच्या विचारांचा मागोवा घेऊन शरद पवार यांना न दुखावता मला जनतेचे भले कसे करता येईल हा विचार माझ्या मनात आहे.  

रामराजे म्हणाले, मला कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही तथापी आजच्या काळात फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ मागासवर्गीय असल्याने उमेदवारीसाठी बाहेरुन लोक आणावे लागतात, मात्र यावेळी होणारा आमदार तालुक्यातीलच असेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख