दोन्ही काॅंग्रेस, शिवसेना एकत्र आल्याने रामराजेंचे टेन्शन गेले....

विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी न सोडल्याचा फायदा!
दोन्ही काॅंग्रेस, शिवसेना एकत्र आल्याने रामराजेंचे टेन्शन गेले....

पुणे : शिवसेनेसोबत दोन्ही काॅंग्रेसचा सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू झाल्याने राष्ट्रवादीच्या जुन्या मंत्र्यांना आनंद तर झला आहेच. पण त्यासोबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या डोक्यावरील अविश्वास ठरावाचे ओझे गेले आहे.

या तीन पक्षांची युती झाली तर रामराजेंचे पद हे 2022 पर्यंत सुरक्षित राहणार आहे. रामराजेंच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गेल्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात जाहीर केले होते. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची युती कायम राहिली असती तर धोका निश्चित होता.

विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी रामराजे हे राष्ट्रवादीवर नाराज असून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वातावरण होते. स्वतः रामराजेंनी फलटणमध्ये कार्य़कर्त्यांचे मेळावे घेऊन याबाबत मनोभूमिका जाहीर केली होती. पण शेवटी ते राष्ट्रवादीसोबतच राहिले. एवढेच नाही तर सध्या सरकार स्थापनेच्या चाललेल्या धामधुमीत त्यांना पक्षाच्या नेत्यांच्या पहिल्या रांगेतच स्थान मिळाले. 

रामराजेंचे जावई राहुल नार्वेकर हे विधान परिषदेतून आता विधानसभेत शिवसेनेकडून गेले आहेत. त्यामुळे सासरे आणि जावई हे दोघेही एकाच सभागृहात यापुढे नसतील.

सध्याच्या बलाबलानुसार विधान परिषदेत भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष आहे. या पक्षाकडे 23 आमदार आहेत. शिवसेनेकडे 13, राष्ट्रवादीकडे 15, काॅंग्रेसकडे 13 असे बलाबल आहे. याशिवाय अपक्ष सहा, लोकभारती, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लकिन पार्टी यांचे प्रत्येकी एक आमदार आहे.  चार रिक्त जागा आहेत. ही आकडेवारी विधानसभा निवडणुकीपूर्वीची आहे. त्यामुळे त्यात थोडाफार बदल होऊ शकतो. शिवसेना आणि दोन्ही काॅंग्रेस यांच्या आमदारांची संख्या 41 पर्यंत जाते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com