ramraje | Sarkarnama

रामराजेंचा ऑस्ट्रेलिया दौरा चर्चेत...! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

रामराजे 15 मे रोजीपुन्हा साताऱ्यात परत येतील. त्यानंतर ते उदयनराजे व त्यांच्या समर्थकांना आरोपांचे उत्तर देतील, असा अंदाज आहे. 

सातारा : राज्य शासनाकडून होणाऱ्या परदेश दौऱ्यांची चर्चा कमी अधिक प्रमाणात होतच असते. तशी चर्चा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरू आहे, पण ती साताऱ्यापुरती मर्यादित आहे. 

गेले महिनाभर खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर दाखल खंडणीच्या गुन्ह्याचा मुद्दा जिल्ह्यात गाजतो आहे. न्यायालयीन प्रक्रियेने दिलासा नाकारल्याने उदयनराजे जिल्ह्याबाहेर आहेत. हा खंडणीचा गुन्हा रामराजेंच्यामुळे दाखल झाल्याचा उदयनराजे समर्थकांचा दावा आहे. यासंदर्भातील वाद रोज रस्त्यावर येत आहेत. त्यातच रामराजे हे काही मंत्र्यांसमवेत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियातील स्मार्ट सिटी मॉडेलचा अभ्यास, पाहणी होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख