चार सामोसे पाठवा, असे कोरोना हेल्पलाइनवर फर्मावणाऱ्या तरुणाला कलेक्टरने दिली ही शिक्षा!

कोरोना व्हायरसच्या माहितीसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर टवाळकी करत गरम सामोसे पाठवा म्हणणाऱ्या युवकाला प्रशासनाने चांगलाच धडा शिकविला आहे.
rampur collector
rampur collector

लखनौ : कोरोना व्हायरसच्या माहितीसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर टवाळकी करत गरम सामोसे पाठवा म्हणणाऱ्याया  युवकाला प्रशासनाने चांगलाच धडा शिकविला आहे. या युवकाला पकडून त्याला गटार साफ करण्याची शिक्षा देण्यात आली. यातून टवाळखोरांनी धडा घ्यावा यासाठी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील युवकाचा गटार साफ करतानाचा फोटो रामपूरच्या जिल्हाधिकाऱ्यायांनी ट्विट केला आहे.


संपूर्ण देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. प्रशासनाकडून यावर लढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनांकडून हेळ्पलाईन तयार करण्यात आल्या आहेत. गरजूंना यावर माहिती देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काही टवाळखोर या हेल्पलाईनवर गमंत करत आहेत. रामपूरच्या एका युवकाने फोन करून ‘गरमागरम सामोसे भिजवा दो’ असे सांगितले.  कंट्रोलरूमचे गांभीर्य न ठेवता त्या तरुणाने विनाकारण फोन करत समोसा मला खाण्यासाठी पाठवा असे सतत फोन केले. वैतागलेल्या कर्मचाऱ्यायांनी हा प्रकार जिल्हाधिकारी यांच्या कानावर घातला. पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. त्याला शहरातील गटारे साफ करण्याची शिक्षा दिली.


खोडसाळपणे कोणी  कर्मचाऱ्यांना  त्रास दिला तर सहन केला जाणार नाही त्यामुळे  युवकांकडून साफसफाई करून घेत असल्याचे रामपूर च्या जिल्हाधिकाऱ्यांनी  ट्विटवर फोटो प्रसिध्द करत  सांगितले.  हेल्पलाईनवर फोन करून काही जण गप्पा मारतात, पिझ्झा मागतात, कोणी औषधांच्या गोळ्यांची मागणी करतात. यामुळे हेल्पलाईनवर गांभिर्याने काम होत नाही. त्यामुळे हा धडा शिकविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला आवाहन केले अहे की ही गमंत करण्याची वेळ नाही. संकटाच्या प्रसंगी सर्वांनी शांतपणे घरात राहायला हवे. कंट्रोल रुमची हेल्पलाईन सतत व्यस्त ठेवणे योग्य नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com