ramesh thorat confident about victory | Sarkarnama

दौंडमध्ये परिवर्तनाचा "राष्ट्रवादी'ला विश्‍वास

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पाटस : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार रमेश थोरात यांचा दौंड तालुक्‍यात झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. त्यांच्यासमवेत तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी आहेत. खडकीत प्रचारासाठी आलेल्या थोरात यांची घोड्यावरून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी तालुक्‍यात परिवर्तन होऊन थोरात आमदार होणार, असा ठाम विश्वास तरुण व ग्रामस्थांनी व्यक्त दिला.

माजी आमदार रमेश थोरात यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. सध्या त्यांचा तालुक्‍यातील गावोगावी प्रचार दौरा सुरू आहे. खडकी येथे ग्रामस्थांनी थोरात यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. थोरात यांनी खडकी, नंदादेवी, मळद, राजेगाव, स्वामी चिंचोली, खानोटा, लोणारवाडी आदी गावांत मतदारांशी संवाद साधला. त्यांची ठिकठिकाणी भाषणे झाली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, जिल्हा परिषद सदस्या सारिका पानसरे, सरपंच मंगेश शितोळे, सचिन वाघमारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख