ramesh kadam, president election | Sarkarnama

रमेश कदमांच्या अर्जावर उद्या  उच्च न्यायालयात सुनावणी 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 12 जुलै 2017

मुंबई, ता. : अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्यात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रपती पदासाठी मतदान करण्याची परवानगी दया, असा अर्ज उच्च न्यायालयात केला असून त्यावर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. 

कारागृहात असलेल्या कदम यांनी 17 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची विनंती स्थानिक न्यायालयात केली होती. परंतु तांत्रिक मुद्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र कोठडीत असलेले दुसरे आरोपी छगन भुजबळ यांना विशेष न्यायालयाने मतदान करण्यास मुभा दिल्यानंतर कदम यांनीही आपल्याला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आमदार व खासदाराला राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. त्यामुळे घटनेच्या नैसर्गिक न्यायतत्वाला बाधा येऊ नये, असा मुद्दा रमेश कदम यांच्यावतीने न्यायालयात मांडला जाण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, भुजबळ आणि रमेश कदम हे दोघेही राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा कॉंग्रेसचे यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख