आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना आमच्या डोक्‍यावर बसविण्याचा प्रयत्न केला : रमेश जारकीहोळी

 आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना आमच्या डोक्‍यावर बसविण्याचा प्रयत्न केला : रमेश जारकीहोळी

बेळगाव : सतीश जारकीहोळी व माझा वाद शाळेत असल्यापासूनच आहे. तो वाद मरेपर्यंत राहणारच, असे सांगतानाच लक्ष्मी हेब्बाळकर यांना विधानसभेची उमेदवारी देण्याची शिफारस करणे ही आपली चूक होती, असे मत माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. कॉंग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जारकीहोळी यांनी शनिवारी (ता. 16) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

कॉंग्रेसचे ट्रबल शूटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी. के. शिवकुमार यांच्यावरही जारकीहोळी यांनी सडकून टीका केली. शिवकुमार यांचा जिल्ह्याच्या राजकारणातील हस्तक्षेप वाढला. विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभरातच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना आमच्या डोक्‍यावर बसविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय मी घेतला, असे ते म्हणाले. आमदार हेब्बाळकर यांना मंत्री नव्हे, तर मुख्यमंत्री करू देत; पण, पक्षातील ज्येष्ठ आमदारांची कदर ठेवायला हवी. आमदार हेब्बाळकर यांना मंत्रिपद व कोणत्याही महामंडळाचे अध्यक्षपद देऊ नये, अशी अट मी घातली होती, तरीही त्यांना महामंडळ दिले. त्याविरोधात सतीश यांनी आवाज उठविला नाही. कारण, ते चहा पिण्यासाठी आमदार हेब्बाळकर यांच्या घरी जातात. मी विरोध केल्यामुळे आमदार हेब्बाळकर यांना मंत्रिपद मिळाले नाही. मुळात त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊनच चूक झाली. 

आमदार हेब्बाळकर यांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सतीश जारकीहोळी यांच्यामुळे मिळाले. यासाठी मी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे नाव सुचविले होते. कॉंग्रेसची सूत्रे शिवकुमार यांच्या हातात आल्यानंतर जारकीहोळींना संपविण्याचा घाट घातला होता ; पण, तो उधळून लावला, असेही रमेश यांनी सांगितले. राजकारणात ज्येष्ठ-कनिष्ठ असतात. त्यामुळे ज्येष्ठांचा मान राखायला हवा, अशी टिप्पणीही त्यांनी केली. सतीश जारकीहोळी व सिद्धरामय्या यांच्याशी झालेल्या मतभेदांबाबत बोलताना त्यांनी झाल्या प्रकरणात सिद्धरामय्या यांचा काहीही दोष नसल्याचे ते म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com