पुरंदरच्या सभापतिपदी शिवसेनेचे रमेश जाधव 

पुरंदरच्या सभापतिपदी शिवसेनेचे रमेश जाधव 

सासवड : पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी दिवे पंचायत समिती गणाचे सदस्य व गुरोळी गावचे सुपुत्र रमेश जाधव यांची आज बिनविरोध निवड झाली. राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सूचनेनुसार त्यांची निवड झाली. 

पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सभापती अर्चना समीर जाधव यांनी शिवसेना पक्षांतर्गत ठरल्यानुसार दुसऱ्या सदस्याला संधी मिळण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच दिला होता. त्यामुळे नवीन सभापतिपदाच्या निवडीसाठी बैठकीचे आयोजन केले होते.

उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हजर होते. त्यांनी रमेश जाधव यांची निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, उपसभापती दत्तात्रेय काळे, सदस्या नलिनी लोळे, अर्चना जाधव, सदस्य अतुल म्हस्के, प्रा. गोरक्षनाथ माने, सुनीता कोलते, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, राजाराम झेंडे, मंदार गिरमे, उमेश गायकवाड, सचिन भोंगळे, अभिजित जगताप आदी उपस्थित होते. 

अडीच वर्षांत तीन सभापती 
पुरंदर पंचायत समितीच्या एकूण आठ सदस्यांमध्ये शिवसेनेचे सहा व कॉंग्रेस दोन, असे बलाबल आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या तालुका पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीला तालुका पंचायत समितीवर प्रथमच भगवा फडकला होता. त्या वेळी पहिले सभापती म्हणून शिवसेनेने अतुल म्हस्के यांना संधी दिली होती. दीड वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यावर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागी राज्यमंत्री शिवतारे यांच्या सूचनेनुसार अर्चना जाधव यांची वर्णी लागली होती. आता रमेश जाधव यांना संधी मिळाली झाले. सभापतिपदावर तिसरा सदस्य आला तरी उपसभापतिपदी दत्ता काळे हेच कायम आहेत. 

म्हस्के यांची शिफारस 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी सभापती अतुल म्हस्के यांना पुन्हा सभापतिपदावर संधी देण्याचे संकेत शिवसेनेच्या गोटात मिळत होते. मात्र, स्वतः म्हस्के यांनीच रमेश जाधव यांच्या नावाची शिफारस राज्यमंत्री शिवतारे यांच्याकडे केली. ते उद्योजक व शेती व्यावसायिक असून, ते शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुखही होते. त्यांचा दांडगा संपर्क असून, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या संपर्काचा उपयोग होईल. त्यामुळे त्यांना संधी दिल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव व अतुल म्हस्के यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com