ramesh gholap appointes as kodarma collector | Sarkarnama

रमेश घोलप यांची कोडरमाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 जुलै 2019

मोडनिंब : सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आयएएस अधिकारी रमेश घोलप (महागाव, ता. बार्शी) यांची झारखंडमधील कोडरमा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक झाली आहे.

यापूर्वी धनबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून दोन महिने केलेली त्यांची कारकीर्द सक्त कारवायांमुळे गाजली. त्यांच्या झालेल्या बदली विरोधात तेथील नागरिकांनी सात दिवस रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.

नक्षलग्रस्त भागात जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना नक्षलग्रस्त भागातील युवकांना व नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. झारखंड कृषी राज्याचे कृषी आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी व मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद निधी यासारख्या महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या. यापूर्वी एसडीएम खूंटी, एसडीएम बेरमो (बोकारो), सहायक जिल्हाधिकारी, रांची, ऊर्जा आणि गृह विभागाचे सहसचिव, सरायकेला- खरसावाचे जिल्हाधिकारी या पदावर काम केले. कृषी आयुक्त या पदाबरोबरच झारखंड राज्य कृषी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व हॉर्टिकल्चर आयुक्त या पदांचा अतिरिक्त कारभार त्यांनी सांभाळला.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख