ramesh bagave opposes reentry of congress leaders | Sarkarnama

रमेश बागवेंनी `गयारामां`विरुद्ध दंड थोपटले : `घरवापसी` करण्यास नकार

संपत मोरे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

..

पुणे : "पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघात ज्यांनी कॉंग्रेस पक्षाशी गद्दारी केली, पक्षाचे उमेदवार पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले.त्यांना पक्षात घेऊ नका."असा ठराव पुणे शहर काँग्रेसच्या बैठकीत झाल्याची माहिती माजी मंत्री,पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिली.

पुणे शहर काँग्रेसच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या अभिनंदनाचा ठराव झाला. या ठरावासोबत 'गयारामांना पुन्हा पक्षात घेऊ नका,'असाही महत्वाचा ठराव झाला आहे.

बागवे म्हणाले,"आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जे पक्ष सोडून गेले त्यांच्या परत यायच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र अशा प्रवृत्तीना पक्षात घेऊ नका अशा निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.पक्ष अडचणीत असताना जे पक्षाला सोडून गेले त्यांना कदापि पक्षात घ्यायला नको असे वाटते."

"ज्यांना पक्षाने पदे दिली.जे पक्षाच्या जीवावर मोठे झाले.ते लोक पक्षाची पडझड सुरू असताना  पक्षास सोडून गेले. जेव्हा लढण्याची वेळ होती तेव्हा ते निघून गेले आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पराभूत करण्यासाठी त्यानी प्रयत्न केले. अशा लोकांना पक्षात घ्यायला नको.आता महाविकास आघाडी सत्तेत आली आहे त्यामुळे काही लोकांनी परत येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र त्यांना घ्यायला नको.अशी आम्हा निष्ठावंत लोकांची मागणी आहे. तसा ठराव आम्ही केला आहे. जे अडचणीच्या काळात पक्षासोबत राहिले त्यांच्या मागणीचा विचार व्हावा,"असेही बागवे म्हणाले.

खुद्द बागवे यांच्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून सदानंद शेट्टी, रशीद शेख यांच्यासारखे काॅंग्रेस नेते ऐन निवडणूक प्रचार काळात भाजपमध्ये गेले. बागवे यांचा थोड्या मतांनी सुनील कांबळे यांच्याकडून पराभव झाला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख