Ramesh Adaskar criticizes MLA Prakash Solanke | Sarkarnama

सोळंकेंनी अजून आमदाकीची शपथ घेतली नाही आणि निधी कुठून आणला :आडसकर 

सरकारनामा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

..

माजलगाव: घाटसावळी ते सिरसाळा रस्त्याच्या कामासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे भगिनींनी प्रयत्न करून निधी आणला आहे; परंतु नुकतेच आमदार झालेले प्रकाश सोळंके यांनी याचे श्रेय घेत हा निधी मी आणल्याचे सांगत आहेत. यामुळे आणखी आमदार पदाची शपथही न घेतलेल्या प्रकाश सोळंके यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये, असे भाजपचे रमेश आडसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

आडसकर पत्रकात  म्हणतात , मुंडे भगिनींनी मागील पाच वर्षात जिल्ह्यात कोट्यावधीचा विकास निधी घेचून आणत रस्त्याचे जाळे निर्माण केले आहे. यातच घाटसावळी ते सिरसाळा या रस्त्यासाठी 33 कोटीचा निधी त्यांची मंजूर करून आणला आहे. असे असताना नवनिर्वाचित आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रसिद्धी पत्रक काढून वरील रस्त्याचा कामासाठी कागदपत्राची पूर्तता करून हा निधी आणल्याचे सांगितले आहे. 

वास्तविक पाहता श्री. सोळंके यांनी अद्याप आमदार पदाची शपथही घेतली नसता मुंडे भगिनींनी केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणखी सरकारही स्थापन झालेले नाही, मागील पाच वर्षात ते सत्तेतही नव्हते यामुळे या रस्त्याच्या कामाचा निधी आणण्यात त्यांचे काय योगदान आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुंडे भगिनींनी केलेल्या विकासकामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करून जनतेची दिशाभूल करूनये असे रमेश आडसकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख