क्या हार में, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै ,ही कविता म्हणताहेत आडसकर 

जनतेचा कौल मान्य असून मतदार संघातील जनतेने दिलेले प्रेम कधीच विसरणार नाही . जनतेच्या सुख - दु:खात कायम सोबत राहू . -रमेश आडसकर
adaskar
adaskar

माजलगाव : निवडणुकीत हरलो तरी थांबणार नाही असे म्हणंत भाजपचे रमेश आडसकर पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले. मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, यासाठी शेतकऱ्यांसह त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.


केज मतदार संघातील रहिवाशी असलेल्या रमेश आडसकर यांना माजलगावकरांनी लाखभर मते दिली. त्यांचा तेरा हजार मतांनी पराभव झाला. मात्र, पराभवानंतर रमेश आडसकर पुन्हा केजला परततील असा विरोधकांचा कयास होता. परंतु, जनतेचा कौल मान्य असून दिलेले प्रेम कधीच विसरणार नाही, जनतेच्या सुख - दु:खात कायम सोबत राहील असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. ‘


क्या हार में, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै,
संघर्ष पथ पर जो भी मिला, ये भी सही... वो भी सही’

या कवितेतल्या ओळी म्हणत पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी रमेश आडसकर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले. 


मागील आठ दिवसापासून मतदारसंघातील माजलगावसह धारूर, वडवणी तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणी - पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली. 


नेताच खचला नसल्याने कार्यकर्त्यांचीही उमेद वाढली आहे. दरम्यान, परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार असल्याचे रमेश आडसकर यांनी सांगीतले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com