आजचा वाढदिवस : खासदार रामदास तडस - ramdas tadas and bjp | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : खासदार रामदास तडस

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 एप्रिल 2018

वर्धा येथील भाजपचे खासदार रामदास तडस यांचा राजकीय प्रवास कॉंग्रेसमधून सुरू झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील "पहेलवान' म्हणून त्यांची ख्याती होती. अनेक विदर्भ व राज्यस्तरीय कुस्त्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. कुस्तीपटू म्हणून ते प्रसिद्ध पावले होते. कुस्ती या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी वर्धा जिल्ह्यात अनेक उपक्रमही राबविले. वर्धा जिल्ह्यातील माजी खासदार दत्ता मेघे यांचे विश्‍वासू म्हणून तडस यांची ओळख होती. कॉंग्रेसचे आमदार म्हणून ते निवडून आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये आले. भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यात ते निवडून आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख