Ramdas Swamy was born with the word "janta Raja": Sharad Pawar | Sarkarnama

"जाणता राजा' हा शब्द रामदास स्वामींनी जन्माला घातला : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

पुणे : "जाणता राजा' हा शब्द रामदासस्वामींनी जन्माला घातला. ते शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली. 

साताऱ्यातील एका कार्यक्रमा श्री. पवार बोलत होते. भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित केले होते. हे पुस्तक मागे घेण्यात आले असले तरी वादविवाद सुरूच आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी यावर भूमिका घ्यावी असे म्हटले होते. तर भाजपची मंडळी गेल्या पाच दिवसापासून शरद पवार यांना जाणता राजा अशी उपाधी कशी लावता अशी टीका केली होती. 

काल उदयनराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांचे नाव घेता टीका केली होती. शिवाजी महाराजांच्या नावाचा शिवसेनेने कसा वापर केला हे ही स्पष्ट केले होते. 

राज्यातील या वादावर आज श्री. पवार यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, की मला जाणता राजा म्हणा असे मी कधीही म्हटले नाही. मुळात "जाणता राजा' हा शब्द रामदास स्वामींनी जन्माला घातला आहे. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे कधीच गुरू नव्हते. तर जिजामाता याच त्यांच्या खऱ्या गुरू होत्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख