मुख्यमंत्री साहेब, वाहिनी तुमच्या  दोन पावलं पुढे आहेत ! - रामदास कदम

मुख्यमंत्री साहेब वाहिनी तुमच्या पुढे दोन पावलं आहेत. त्यांनी मला सह्याद्रीवर बोलावून राज्यात प्लँस्टीक बंदी का होत नाही म्हणून जाब विचारला .-रामदास कदम
Fadanvis-&-Kadam
Fadanvis-&-Kadam

मुंबई  : " मुख्यमंत्री साहेब वाहिनी तुमच्या पुढे दोन पावलं आहेत. त्यांनी मला सह्याद्रीवर बोलावून राज्यात प्लँस्टीक बंदी का होत नाही म्हणून जाब विचारला," गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला.

पर्यावरण विभागा व वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय आदींच्या वतीने 'बदलते हवामान आव्हाने आणि उपाययोजना' या विषयावर विधीमंडळ सदस्यांसाठी संवाद आयोजित केला होता. त्यावेळी रामदास कदम बोलत होते.

रामदास कदम म्हणाले, " आम्ही राज्यात प्लँस्टीक बंदीचा निर्णय घेतला. प्लास्टिक बंदीवर मुख्यमंत्री साहेब वैनी तुमच्या पुढे दोन पावलं आहेत. त्यांनी मला सह्याद्रीवर बोलावून राज्यात प्लास्टिक बंदी का होत नाही म्हणून जाब विचारला होता. त्यावेळी सिने अभिनेत्री जुही चावलाही तिथे उपस्थित  होती. त्यामुळे मी आता पुन्हा सह्याद्रीवर जाऊन वहिनींचे  आभार मानणार आहे. कारण वहिनींनी  जाब विचारल्यामुळे  मी प्लँस्टीक बंदीचा निर्णय  लवकर घेतला."

" या निर्णयाबद्दल मी राज्यात गावागावात फिरून सांगीन की प्लँस्टीक पर्यावरणाला घातक आहे. त्यामुळे  लोकांना पटेल. नाही पटलं तर तीन महिने कारावासाची शिक्षा आहेच की. लोकं परदेशातून आल्यावर विमानतळावरून बाहेर आल्या आल्या पुड्या खाऊन थुंकतात
 . कारण राज्यात कायद्याचा धाक नाही. "

"परदेशात सीसीटिव्ही असतात. दंड होतो. त्यामुळे लोकं नियम पाळतात. पण आपल्याकडे कायद्याचे पालन होत नाही. त्यामुळे आपण कायद्याचा धाक दाखवून द्यायला हवा. केल्याने होत आरे रे आधी केलचं पाहिजे. राज्यात कुणाला किती झाडं तोडण्याची परवानगी दिली. त्यांनी किती झाडं लावली. त्यातील किती जगली याची चौकशी करा. अन् त्यांना कायद्याचा धाक दाखवून द्या", अशा मागणीही रामदास कदम यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com