शिवसेना शाखा कोणी विकून खाल्ली ?  : रामदास कदम 

दापोलीत शिवरायांच्या पुतळ्यासाठी कुणी कुणी पैसे काढले व ते गेले कुठे हे दापोलीतील जनतेला माहीत आहे, येथील शिवसैनिकांनी घामाच्या पैशातून शिवसेना शाखा उभारली ती कोणी विकून खाल्ली हे शिवसैनिक चांगलेच ओळखून आहेत - कदम
Kadam_dalvi.
Kadam_dalvi.

दाभोळ : दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी आपली केवळ बदनामी करण्यासाठीच आपण जादूटोणा करत असल्याचा आपल्यावर आरोप केला असून आपण दळवी यांच्याविरोधात 10 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहोत.  त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षप्रमुखांकडे करणार असल्याची माहिती आज राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

दोन दिवसांपूर्वी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना पर्यावरण मंत्री रामदास कदम हे बंगाली बाबाना सोबत घेऊन फिरतात व जादूटोणा करत असल्याचा आरोप केला होता.
आज शिवसेनेच्या दापोली तालुका कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमासाठी रामदास कदम आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले , दळवी याना रामदास कदम यांची कावीळ झाली असून दळवींना आता सर्वत्र रामदास कदम दिसू लागले आहेत. मी विरोधी पक्ष नेता असतानाच जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाल्याची दळवी याना माहिती नसावी. आपण जादूटोणा करत असल्याची आठवण दळवी याना 2019 मध्ये झाली.  आपल्या विरोधात काहीही वक्तव्य करून चर्चेत राहण्यासाठी दळवी यांचा हा खटाटोप असल्याचेही कदम यांनी सांगितले.

दापोलीत शिवरायांच्या पुतळ्यासाठी कुणी कुणी पैसे काढले व ते गेले कुठे हे दापोलीतील जनतेला माहीत आहे, येथील शिवसैनिकांनी घामाच्या पैशातून शिवसेना शाखा उभारली ती कोणी विकून खाल्ली हे शिवसैनिक चांगलेच ओळखून आहेत, असेही श्री. कदम म्हणाले. 
आपण गेल्या 4 वर्षात दापोली विधानसभा मतदारसंघात 1 हजार 200 कोटींचा निधी आणला असून दळवी समोर आल्यास त्याचा आपण हिशोबही देऊ.  एकीकडे आपल्याला शिवसेनेचा नेता म्हणायचे तर दुसरीकडे आपल्याविरोधात प्रसारमाध्यमातून बोलायचे हे दळवी यांचे नेहमीचेच आहे, अशी टीका त्यांनी केली . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com