ramdas kadam | Sarkarnama

आमचा मुख्यमंत्र्यावर अविश्वास नाही पण... - रामदास कदम

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई : आमचा मुख्यमंत्र्यावर अविश्वास नाही पण कर्जमाफीमध्ये 89 लाख शेतकऱ्यांची यादी जुळते की नाही हे पाहणार आहोत. आठ दिवसांत किती जणांना कर्ज माफी दिली, मदत दिली, वन टाइम सेटलमेंट याची यादी बॅंकाकडून मिळाली पाहिजे, असा आग्रह पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. 

रामदास कदम पुढे म्हणाले, " राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. कर्जमुक्तीची मागणी सतत होत होती. गेल्या अधिवेशनात भाजप विरुद्ध सगळे पक्ष असे चित्र होते, सदनाचं कामकाज बंद पाडले होत. कर्जमुक्ती करणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी उद्धव ठाकरे यांना दिले होते. आम्ही दिल्लीला ही गेलो होतो. नंतर शेतकऱ्यांचा संप झाला. कर्ज मुक्तीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यावर उद्धवजीनी अभिनंदनही केले. 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते याची आठवणही कदम यांनी करून दिली. 

ते पुढे म्हणाले, कर्जाचे हफ्ते द्यायला पैसे नसले की बॅंक घराबाहेर नोटीस लावते, घराबाहेर ढोल वाजवते. मग आता कर्ज मुक्ती झाली पाहिजे, यादी मिळावी यासाठी आम्ही आज राज्यभर बॅंकांच्या बाहेर ढोल वाजवले आहेत. मुख्यमंत्री म्हणत असलेली आकडेवारी आणि बॅंकांची यात तफावत आहे का ते पाहणार असल्याचे सांगत कदम म्हणाले, जर सरकारने 8 दिवसात यादी दिली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कदम यांनी यावेळी दिला. 

कदम पुढे म्हणाले, " राष्ट्रवादीचे नेते अजित दादा दिवसा भाजपवर तोंडसुख घेतात आणि रात्री काळोखात वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्याना भेटतात असा टोमणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मारला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख