शरद पवार यांना रामदास आठवले यांची उपपंतप्रधान पदाची आॅफर

शरद पवार यांना रामदास आठवले यांची उपपंतप्रधान पदाची आॅफर

वर्धा : राष्ट्रावादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस सोबत न जाता भाजपप्रणित एनडीएत यावे ते नक्की उपपंतप्रधान होतील, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी ते सतेत येऊ शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस सोबत न जाता एनडीएमध्ये याव. राहुल गांधींना पंतप्रधान बनविण्यासाठी काॅंग्रेस प्रयत्न करीत आहे. ममता बॅनर्जी, देवेगौडा, चंद्राबाबू नायडू हे अन्य नेतेदेखील पंतप्रधान पदाच्या शर्य़तीत आहे. शरद पवार हे राहुल गांधींना आणि राहुल हे पवारांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देऊ शकत नाही. काॅंग्रेसला ६०-७० आणि राष्ट्रवादीला पाच ते सात जागा मिळतील. त्यामुळे या विरोधकांची सत्ता येणार नाही. त्यामुळे पवारांनीच एनडीएत यावे.

राममंदिर अयोध्येत व्हावे पण त्यासाठी न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी अध्यादेश काढणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य करावा, अशीही सूचना त्यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com