ramdas athwale expects to fight election from mumbai | Sarkarnama

रामदास आठवलेंचा खासदार राहुल शेवाळेंच्या मतदारसंघावर डोळा

यशपाल सोनकांबळे
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे माझी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. परंतु अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. जागावाटपामध्ये या संदर्भात चर्चा केली जाईल, असे संकेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिले. 

पुणे माझी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. परंतु अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. जागावाटपामध्ये या संदर्भात चर्चा केली जाईल, असे संकेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिले. 

औंध येथील पंडीत भीमसेन जोशी नाट्यगृहात एका खासगी कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यानंतर सरकारनामाशी बोलताना याबाबत स्पष्टीकरण करताना ते म्हणाले की आगामी लोकसभा निवणुकांमध्ये जागावाटपा दरम्यान यासंदर्भात चर्चा तरुन निर्णय घेतला जाईल. दक्षिण मध्य मुंबईतुन निवडणूक लढवावी याबाबत कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. याबाबत अजुन मी विचार केलेला नाही

रिपब्लिकन पक्षाच्या 61 व्या स्थापना दिनानिमित्त येत्या 3 ऑक्टोबर रोजी ठाण्यात रिपाइंचामहामेळावा आयोजित  करून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी आठवले यांनी मुंबईतील वांद्रे पुर्व येथे राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. त्या बैठकीत ' दक्षिण मध्य मुंबईतुन लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत देत कामाला लागा' असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी रिपाइं चे मुंबईतील सर्व शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आठवले सध्या महाराष्ट्रातुन राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. सन 1998 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार लोकसभेत निवडून गेले होते. त्यावेळी दक्षिण मध्य मुंबईतुन आठवले विजयी झाले होते. तसेच ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत.  पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी येथे लोकसभा निवडणुकीत आठवले सन 2009 मध्ये पराभूत झाले होते.

 आगामी 2019 लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत रिपब्लिकन पक्षाची युती कायम असेल संकेत त्यांनी दिलेले आहे. त्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रामध्ये सुरक्षित मतदारसंघ म्हणुन दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे असून तेथे राहुल शेवाळे हे खासदार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख