रामदास आठवलेंनी असा पदार्थ बनवला की मुलगाही म्हणाला टेस्टी!

अनेक नेत्यांना सध्या सक्तीची विश्रांती मिळाली आहे. त्याचा ते असा उपयोग करीत आहेत.
ramdas athawale
ramdas athawale

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जनतेने कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी घरीच राहा, असे आवाहन करीत स्वतःपण त्याचे पालन केले आहे. आठवले यांनी तर घरी राहून आज आपला आवडता पदार्थ केला. अर्थात हा पदार्थ भलताच सोपा होता. 

आठवले यांनी पत्नी  सीमा  यांच्याकडून स्वयंपाकघराचा ताबा घेत  आम्लेट तयार केले. वडिलांनी तयार केलेले आम्लेट त्यांचे चिरंजीव कुमार जित यांनी टेस्ट केले.  डॅडिंनी आम्लेट चांगले केल्याची पावती जितने दिली.

याबाबत आठवले म्हणाले,``वर्षोनुवर्षे समाजकार्यात व राजकारणात घरी थांबण्यास इतका वेळ कधीही मिळाला नाही. लॉकडाऊनमुळे सध्या  घरी तळ ठोकून आहे. त्यामुळे माझे  कुटुंबीय देखील आनंदी आहेत.  मी आतापर्यंत  किचनमध्ये कधीच पाय ठेवला. नव्हता. आता लॉकडाऊनमुळे आम्लेट बनविले. मला चहासुद्धा चांगला बनविता येतो, बर का!``

आठवले यांनी कोरोनाविरद्धच्या लढाईत गो कोरोना गो, अशी घोषणा देत अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचा या घोषणेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com