धास्तावलेल्या आठवलेंची शरद पवारांशी चर्चा

भाजपने फारच अडवणूक केली तर आठवले हे महाविकास आघाडीचा विचार करू शकतात, असा संदेश या भेटीतून देण्यात आला आहे.
ramdas athawale meet sharad pawar in delhi
ramdas athawale meet sharad pawar in delhi

पुणे: राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री आणि आरपीआय (ए) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना भाजपकडून संधी दिली जाणार नसल्याच्या
बातम्या बुधवारी माध्यमांत झळकल्या. त्यानंतर आज आठवले यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट दिली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी रामदास आठवले हे भाजपसोबत महायुतीत आले. त्यावेळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने आठवले यांना राज्यसभेची एक जागा सोडण्यात आली. आठवले यांना त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून राज्यसभेवर पाठवण्यात आले, त्यावेळी भाजपने प्रकाश जावडेकर यांचे तिकीट कापले होते. 

नंतरच्या काळात भाजपने आठवलेंना केंद्रिय मंत्रीमंडळात संधी दिली. 2019 च्या निवडणुकीनंतरही त्यांचे पद कायम ठेवले, पण आता त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आली आहे. त्यांच्या जागेसह महाराष्ट्रातील राज्यसभेच्या इतर जागांची निवडणूक मार्चअखेर लागणार आहे. यावेळी आठवलेंना भाजप संधी देणार नाही, अशा बातम्या आहेत. त्याबरोबरच भाजप उदयनराजे भोसले यांना संधी देणार तसेच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत  जाणार अशाही चर्चा आहेत. फडणवीस व उदयनराजे हे नावे पाहिली तर आठवलेंवर संक्रांत येवू शकते.

महत्वाची बाब म्हणजे यावेळी आठवलेंच्या पक्षाला जागा सोडण्याची भाजपची मानसिकता नाही. त्यामुळे आठवलेंना सहजासहजी राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. त्याचा परिणाम म्हणून आठवले यांच्या घरी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली. भाजपने फारच अडवणूक केली तर आठवले हे महाविकास आघाडीचा विचार करू शकतात, असा संदेश या भेटीतून देण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com