ramdas athawale on elgar parishad investigation | Sarkarnama

उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य: आठवले

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची मतभिन्नता उघड झाली आहे. राज्य सरकारमधील निर्णय अंतर्गत चर्चेतून एकमत करून घेतले गेले पाहिजेत.  

मुंबई : एल्गार परिषदेचा तपास तपास एनआयएकडे देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

कोरेगाव भीमा प्रकरणातील एल्गार परिषदेचा तपास एनआयए करणार आहे. त्याबरोबर आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्याचाही तपास एनआयए ला देण्यात यावा, अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.

एखाद्या प्रकरणावरून राज्य सरकारमधील सत्तापक्षातील नेत्यांचे जाहीर वाद होणे योग्य नाही. असे यापुर्वीही कधीही झाले नाही. सरकारने अंतर्गत चर्चा करून निर्णय घेतले पाहिजेत. जाहीररित्या वाद टाळले पाहिजेत असा सल्ला रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख