ramdas athawale attack prakash ambedkar | Sarkarnama

ज्यांच्या डोक्‍यात हवा आहे ते अद्याप गल्लीबोळात, आठवलेंचा नाव न घेता आंबेडकरांना टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई : ""ज्यांच्या मनात अहंकार त्यांना कोणतीच गोष्ट पटत नाही. अहंकारातून होणाऱ्या टीकेमुळे आपले काम थांबवायचे नाही तर ती टीका गाडून पुढे जायचे असते असे सांगत ज्यांच्या डोक्‍यात दिल्लीची हवा आहे ते अजूनही गल्लीबोळात आहेत असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता लगावला. 

दादर येथील येथील एका कार्यक्रमात आठवले बोलत होते. ते म्हणाले, "" हल्ले झाले म्हणून घरी बसणार नाही.काम करणाऱ्या लोकप्रिय व्यक्तीवर अहंकारातून हल्ले होतात. माझ्यावर ज्यांनी अटॅक केला त्यांना हार्ट अटॅक येतो. तसेच ेमी मंत्रिपदासाठी काम करीत नाही. मी जिथे जातो त्यांना सत्ता मिळते.'' 

मी मंत्रिपदासाठी काम करीत नाही. मी जिथे जातो त्यांना सत्ता मिळते. 1990 मध्ये कॉंग्रेस सोबत युती केली शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला मंत्री केले तसेच शिवशक्ती भीमशक्ती युती केली. त्यानंतर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले. एनडीए ची सत्ता आली आणि मला मंत्रिपद मिळाले. मी स्वतःला विद्वान नेता असे समजत नसून मी कायम कार्यकर्ता आहे.असे आठवले म्हणाले.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख