कॉंग्रेस आणि राहुलनी मिळून सर्वांना खुप हसवलं..पण मला मात्र पुर्णपणे फसवलं : आठवलेंची शीघ्रकविता

आज प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी भाजपचे नागपुरचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली. मंचावर भाषणासाठी रामदास आठवले यांचे नाव घेताच जनतेतून टाळ्या आणि हास्याची कारंजी उडाली. आठवलेंच्या शिघ्रकवितांनी नागपुरकरांचे चांगलेच मनोरंजन केले. नागपुरकरांनीही त्यांना मनस्वी, उत्स्फूर्त दाद दिली.
 कॉंग्रेस आणि राहुलनी मिळून सर्वांना खुप हसवलं..पण मला मात्र पुर्णपणे फसवलं : आठवलेंची शीघ्रकविता

नागपूर : आज प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी भाजपचे नागपुरचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली. मंचावर भाषणासाठी रामदास आठवले यांचे नाव घेताच जनतेतून टाळ्या आणि हास्याची कारंजी उडाली. आठवलेंच्या शिघ्रकवितांनी नागपुरकरांचे चांगलेच मनोरंजन केले. नागपुरकरांनीही त्यांना मनस्वी, उत्स्फूर्त दाद दिली.

गडकरींच्या सभेसाठी आले आहेत अमित शहा
महायुतीला मिळणार विदर्भातील जागा दहा
नाना पटोलेंकडे वाकड्या नजरेने पहा
आणि नितीन गडकरींसोबत मनापासून रहा

या चारोळीने आठवलेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आपणही एकेकाळी कॉंग्रेसच्या सोनीया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवारांसोबत होतो. पण यांना दिल्लीच्या बंगल्यातून माझे सामान बाहेर काढले होते. त्याचवेळी मी ठरवले होते की यांना सत्तेतून बाहेर काढायचे आणि भाजप-शिवसेनेसोबत मिळून मी खरोखरच यांना सत्तेतून बाहेर काढल्याचे त्यांना यावेळी सांगितले.

कॉंग्रेस आणि राहुलनी मिळून सर्वांना खुप हसवलं
पण मला मात्र पुर्णपणे फसवलं

काँग्रेसने केलेला दुजाभाव त्यांनी अशा पद्धतीने मांडला. नितीन गडकरींसोबत आपली मैत्री जुनी आहे. पूर्वी आतून-आतून होती, आता पूर्ण उघड-उघड बाहेरुन आहे. असे सांगत मैत्रीबद्दल त्यांनी खालील ओळी म्हटल्या...

नितीन गडकरी माझे अत्यंत जवळचे मित्र
कारण माझ्या हृदयात आहे भिमाचे चित्र

भाजप-शिवसेना जातीयवादी पक्ष नाहीत. दोन्ही पक्षांबद्दल तसा अपप्रचार केला जातो, असे ते म्हणाले. मोदींवर टिका करणाऱ्यांचा समाचार त्यांनी पुढील ओळींतून घेतला....

करा तुम्ही मोदींवर कितीही टीका
त्या पचवायच्या कशा ते माझ्याकडून शिका

यावेळची लोकसभेची निवडणूक रामटेकमधून लढण्याची ईच्छा ते लपवू शकले नाहीत. त्यांच्या मनातली घालमेल त्यांनी खालील ओळींतून व्यक्त केली.......

हो नाही करता करता भाजप-सेनेची झाली युती
रामटेकचे स्वप्न पाहता पाहता मात्र माझी झाली माती

आणि यानंतर लगेच आठवलेंनी पुढील ओळी सादर केल्या

आज यहा आये है सब महायुती जमाने
रामटेकसे चून कर आयेगे कृपाल तुमाने

आणि
कॉंग्रेसने दिया मुझको धोका
मोदीने दिया मंत्रीपद का मौका

या ओळींनी आठवलेंनी भाषणाचा समारोप केला.

आजच्या सभेला मंचावर नागपुरचे उमेदवार नितीन गडकही, रामटेकचे उमेदवार कृपाल तुमाने, माजी मंत्री सुलेखा कुंबारे, संदीप जोशी, आमदार कृष्णा खोपडे, माजी मंत्री दत्ता मेघे, महापौर नंदा जिचकार, खासदार विकास महात्मे, भाजपचे शहरअध्यक्ष सुधाकर कोहळे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com