Rahul Gandhi - Ramdas Athavale
Rahul Gandhi - Ramdas Athavale

राहुल गांधींना 'पप्पू' नाही, आता 'पप्पा' बनण्याची गरज : रामदास आठवले

कल्याण मधील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद मध्ये दिलखुलास चर्चा केली. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक वर भाष्य करताना आठवले म्हणाले, की तेथील निकालाने आगामी लोकसभा निवडणुकीत काडीमात्र फरक पडणार नाही. तेथे भाजपाचा पराभव झाला असेल, मात्र नरेंद्र मोदी हरले नसल्याचे मत यावेळी आठवले यांनी व्यक्त केले.

कल्याण : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पप्पू नव्हे पापा होण्याची वेळ आली असून त्यासाठी त्यांनी लग्न करावे असा सल्ला कोणी जोतिष्याने नव्हे, तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिलाय. 

कल्याण मधील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद मध्ये दिलखुलास चर्चा केली. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक वर भाष्य करताना आठवले म्हणाले, की तेथील निकालाने आगामी लोकसभा निवडणुकीत काडीमात्र फरक पडणार नाही. तेथे भाजपाचा पराभव झाला असेल, मात्र नरेंद्र मोदी हरले नसल्याचे मत यावेळी आठवले यांनी व्यक्त केले. 

त्या निवडणुकीनंतर आम्ही चिंतन करत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आगामी कालावधीत घेणार असल्याचे यावेळी रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. यावेळी निवडणूक काळात भाजपा सहित अन्य पक्षाने राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून खिल्ली उडवली मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवली यावर मिश्किलपणे आठवले म्हणाले ''राहुल गांधी यांची पप्पू नव्हे तर आता पापा बनण्याची वेळ आली असून त्यांनी त्यासाठी लग्न करायला हवे," 

रिपब्लिकन ऐक्याबाबत आठवले म्हणाले की तशी जनतेची मागणी आहे मात्र दलित नेत्यांच्या मनात नाही. मी तर एक गल्ली मधील कार्यकर्ता असून प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मी तयार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. केंद्र सरकार मध्ये नितीन गडकरी आणि स्वतः च्या विभागामार्फत होणाऱ्या कामाचा आढावा घेताना ते म्हणाले, "निश्चित महागाई,जीएसटी बाबत नाराजी नागरिकांमध्ये आहे. ती दूर करण्याची तयारी सुरू असून त्याचा फायदा निश्चित लोकसभा निवडणुकीत होईल." 

''अंबरनाथ मधील घटना घडू नये यासाठी विशेष लक्ष देणार असून जेव्हा एखादा नेता मोठा होतो तेव्हा असूया निर्माण होते. ज्याने हल्ला केला तो माझ्या समाजाचा असला तरी त्याने का केले ते पोलीस तपासत आहेत. माझा बंदोबस्त वाढविण्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे." असे आठवले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

"शिवसेना भाजपा मधील एकमेकांबाबतची असूया कमी झाल्यास दोन्ही पक्षाला फायदा असून आगामी काळात त्यांनी युती करून लढल्यास फायदा आहे मात्र युती न केल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. जनतेचे भ्रम निराश दूर करण्यासाठी सेना भाजपा एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे," असेही आठवले म्हणाले.

विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये मन एकत्र नसल्याने लोकसभा जिंकू शकणार नसून काँग्रेस ला 100 ही जागा मिळणार नसून मोदी सरकार पुन्हा येईल असाही दावा त्यांनी यावेळी केला. छगन भुजबळ यांना सरकार ने नव्हे आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अडचणीत आणल्याचे मत व्यक्त करत भुजबळ यांच्या सोबत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com