आठवलेच म्हणताहेत, महाराष्ट्रात आमच्या जागा कमी येतील

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाला ४५जागा मिळतील, असा निर्धार अमित शहा यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी व्यक्त केला असला तरी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र महाराष्ट्रात आमच्या जागा कमी येतील, असे वक्तव्य केले आहे.
आठवलेच म्हणताहेत, महाराष्ट्रात आमच्या जागा कमी येतील

लातूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाला ४५जागा मिळतील, असा निर्धार अमित शहा यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी व्यक्त केला असला तरी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र महाराष्ट्रात आमच्या जागा कमी येतील, असे वक्तव्य केले आहे. राज्यात ३७ ते ३८ जागा येतील. महाराष्ट्राबरोबरच उत्तरप्रदेशमध्ये आमच्या जागा कमी येतील. तसाच परिणाम राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरातमध्येही काहीसा जाणवेल. असे असले तरी सरकार स्थापन करण्याला आम्हाला कसलीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आठवले सध्या लातूरमध्ये आले आहेत. ते म्हणाले, मागील निवडणूकीत जशी आमची हवा होती तशी यंदा नाही, असे अनेकजन म्हणत आहेत. पण आम्हाला तसे वाटत नाही. मात्र, एक खरे आहे की मागील निवडणूकीत जेवढे मताधिक्य आम्हाला मिळाले होते तेवढे यंदा मिळणार नाही. काही जागा कमी होतील. तर काही राज्यात वाढतीलसुद्धा. त्यामुळे नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील. मते घटण्याचे कारण काय, या प्रश्नाला आपल्या शैलीत ‘आम्ही कामे भरपूर केली’, म्हणत त्यांनी बगल दिली. लातूरची जागा शंभर टक्के आम्हालाच मिळणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रात ३७ ते ३८ जागा आम्हाला मिळतील, असेही ते म्हणाले.

आठवले म्हणाले, गेली काही दिवस मी दुष्काळी भागाचा दौरा करत आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे, सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा काळात त्यांना मदतीचा हात देणे, त्यांच्या पाठीशी राहणे  गरजेचे आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना भेटून केंद्राकडून आलेली मदत तातडीने दुष्काळग्रस्तांना द्या, असे सांगणार आहे. अनेक गावांत दुष्काळ असून जाचक नियमांमुळे ती गावे दुष्काळग्रस्ताच्या यादीत आली नाहीत. त्यामुळे जुने निकष बदलण्याचीही गरज आहे. दुष्काळग्रस्तांचे वीजबिल माफ व्हायला हवे. त्यांना पाणी कसे मिळेल, हेही पहायला हवे.

मग कमळाचे मत घड्याळाला
घड्याळासमोरील बटण दाबले की कमळाला मत जाते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला होता. यावर मिस्किल शैलीत आठवले म्हणाले, ''आम्हाला काही लोक भेटले. ते म्हणू लागले, कमळासमोरील बटण दाबले की घड्याळाला मत जात आहे.'' एखादी दुसरी मशिन खराब असू शकते. पण सगळ्याच मशिन बिघडलेल्या नसतात. पवारसाहेबांचे माझे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. पण त्यांना आता बारामतीची जागा हलणार, याची भीती वाटू लागली आहे, हे दिसून येत आहे, अशी टिपण्णीही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com