मला दोन वेळा लोकसभेत पाठवण्यात  सुधाकरपंतांचा होता मोठा वाटा ... म्हणून आता  ...

..
Sudhakar-Paricharik-Athavle
Sudhakar-Paricharik-Athavle

भोसे (मंगळवेढा) : 

 " मला दोनवेळा लोकसभेत पाठवण्यास सुधाकरपंतांचा होता मोठा वाटा ,

 मला दोनवेळा लोकसभेत पाठवण्यास सुधाकरपंतांचा होता मोठा वाटा ,  

म्हणून आता सुधाकरपंतांना निवडून देऊन काढा विरोधकांचा काटा,"

 अशी शीघ्र कविता करीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुधाकरपंत परिचारक यांना निवडून देण्याचे आवाहन केले . 


" देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा आलें आहे व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा येणार ही काळय़ा दगडावरची पांढरी रेषा आहे. कोणाच्याही भूलथापाना बळी न पडता सहकाराचे महामेरू भाजप - सेना व रयतक्रांती युतीचे पंढरपूर मंगळवेढ्याचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना भरघोस मतांनी विजयी करावे," असे आवाहन  रामदास आठवले यांनी मंगळवेढा येथील प्रचारसभेत केले . 


" राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाने गेली कित्येक वर्षे सत्तेत असूनही शेती सिंचन किवा ग्रामीण भागातील कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत .  या दोन्ही पक्षातून जवळपास सर्वजण इकडे आलें असून मी जोपर्यंत या युतीत आहे तोपर्यंत युतीचच सरकार राज्यात व केंद्रात रहाणार आहे .  आम्ही आता राज्यात पुन्हा युतीचे  सरकार आल्यास आम्ही संपुर्ण तिजोरी तुमच्यासाठी रिकामी करणार आहोत ", असेही श्री. आठवले म्हणाले . 

"  मंगळवेढा तालुक्यातील जमिनीला पाणी मिळाले तर सोने ही उगवेल अशी इथली जमीन आहेत्यासाठी आम्ही येत्या काही दिवसात सुधाकरपंत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली हा पाणी प्रश्न मार्गी लावणार आहोत. राजकारणामध्ये संयम असला पाहिजे काम करण्याची धमक असली पाहिजे .   परंतू येथील दक्षिण भागातील पाणी प्रश्न व महात्मा बसवेश्वर स्मारक प्रश्न  प्रलंबित आहे .   हे  प्रश्न आमचेच सरकार सोड्वणार आहे", असेही ते म्हणाले .

 व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे,स्टार प्रचारक हरिश्चंद्र भोई, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अँड.नंदकुमार पवार, चरनूकाका पाटील, नगरसेवक अजित जगताप, माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे, माजी सभापती शिवानंद पाटील,औदुंबर वाडदेकर, माजी नगरसेवक गोपाळ भगरे,चंद्रशेखर कोंडुभैरी, शिवसेना शहरप्रमुख सुनील दत्तू, रासपचे धनाजी गडदे, दाजी पाटील आदी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com