राज ठाकरेंनी  केलेली गोळ्या घालण्याची  भाषा असंवैधनिक : राज्यमंत्री रामदास आठवले

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तबलगी जमातीने गर्दी जमविण्याचा केलेला प्रकार निषेधार्ह आहे. तबलगी प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कठोर कारवाई करावी. मात्र गोळ्या घालण्याची भाषा कोणी करू नये गोळ्या घालायच्या असतील तर पाकिस्तानातील अतिरेक्यांना घाला,असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे
Ramdas Athavale opposes views of Raj Thakre about Tablighi Jammat
Ramdas Athavale opposes views of Raj Thakre about Tablighi Jammat

मुंबई : ''राज ठाकरे हे जबाबदार  राजकीय नेते आहेत. त्यांनी गोळ्या घालण्याची केलेली भाषा ही असंवैधनिक आहे. बेजबाबदार वक्तव्य आहे. हिंसेला प्रोत्साहन देणारी भाषा कुणीही वापरू नये. जर सगळे असे हिंसक बोलू लागले तर  दोन्ही बाजुंनी हिंसाचार होईल,'' असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. भावना भडकविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमीका योग्य असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

'कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तबलगी जमातीने गर्दी जमविण्याचा केलेला प्रकार निषेधार्ह आहे. तबलगी प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर  कठोर कारवाई करावी. मात्र गोळ्या घालण्याची भाषा कोणी करू नये गोळ्या घालायच्या असतील तर पाकिस्तानातील अतिरेक्यांना घाला,'' असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

राज ठाकरेंच्या भावना समजू शकतो 

''राज ठाकरे हे चांगले वक्ते आणि नेते आहेत. तबलीगी जमाती कडून होत असलेले प्रकार पाहून राज ठाकरे यांच्या भावना भडकल्या असतील, हे आम्ही समजू शकतो. मात्र त्यांच्या सारख्या राजकीय नेत्याने लोकशाही व्यवस्थेत गोळ्या घाला असे असंवैधनिक  बेजबाबदार निषेधार्ह विधान करणे योग्य नाही.  त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे,'' असा सल्ला आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.

''तबलिगींनी मरकज साठी गर्दी जमविली. त्यातील लोक देश भर विखुरले. कोरोना चे रुग्ण वाढण्यात काही प्रमाणात मरकस मध्ये सहभागी होऊन आपापल्या राज्यात परतलेल्या तबलीगी जमातीचे लोक कारणीभूत ठरले आहेत. मात्र तबलगिंनी कोरोना आणला असे म्हणणे योग्य नाही. याप्रकरणी सखोल चौकशी करून  जबाबदारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात भडकाऊ चुकीचे फेक व्हीडियो कोणी प्रसारित करू नये. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे हिंसक भडकाऊ वक्तव्य कोणी करू नये,'' असेही आवाहन आठवले यांनी केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी कायदा सर्वात श्रेष्ठ असल्याचे सांगत भावना भडकविणाऱ्यांची, तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या प्रकरणी भूमिका योग्य असल्याचे आठवले म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com