आठवलेंच्या निवासस्थानी मजुरांसाठी रोज जेवणाची व्यवस्था

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोनोच्या विरोधातील लढाईसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान केअर फंडासाठी एक कोटी तर मुख्यमंत्री सहायता निधीला आपले दोन महिन्याचे वेतन चार लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे
Ramdas Athavle giving food to needy at his residence in Mumbai
Ramdas Athavle giving food to needy at his residence in Mumbai

पुणे : केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोनोच्या विरोधातील लढाईसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान केअर फंडासाठी एक कोटी तर मुख्यमंत्री सहायता निधीला आपले दोन महिन्याचे वेतन चार लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. आठवले यांच्या बांद्रा येथील 'संविधान' निवासस्थानी  हातावर पोट असलेल्या मजुरांना कालपासून भोजन सुरू केले आहे. चौदा एप्रिलपर्यंत हे भोजन दिले जाणार आहे.

आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनला प्रतिसाद देत पंतप्रधान केयर फंडाला एक कोटी रुपये जाहीर केले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपला दोन महिन्याचा पगार दिला आहे."कोरोनासारख्या संकट समयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षासह सर्व पक्षांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी  सर्वपक्षीय बैठक घ्यायला पाहिजे होती. कोरोनाशी लढा देण्यासाठी विरोधी पक्ष सरकार सोबत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे." अशी सूचना आठवले यांनी केली आहे.  

लॉकडाऊनच्या काळात  रामदास आठवले आपल्या संविधान निवासस्थानी आहेत. ते रोज कॅरम, पूल टेबल असे  विविध खेळ त्यांचे पूत्र जीत आठवले यांच्या सोबत खेळत आहेत. ग्रंथ वाचन करीत आहेत.  गोव्यात अडकलेल्या मजुरांच्या अडचणी आठवले यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन करून तिथल्या मजुरांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्याची सूचना केली. 

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी चांगले काम करीत आहेत. मात्र राज्यावर एखादे मोठे संकट आले तर राज्यातील विरोधी पक्ष आणि सर्व पक्षाच्या नेत्यांचा सल्ला घेण्याची सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्याची परंपरा आहे.ती परंपरा पाळली पाहिजे "असे आठवले यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com